नेपच्यून ग्रह १९ ला येणार पृथ्वीजवळ, प्रतियुती ही खगोलीय घटना;

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: September 17, 2023 06:26 PM2023-09-17T18:26:43+5:302023-09-17T18:27:08+5:30

सूर्याच्याही राहणार अगदी समोर

Neptune will come close to Earth on the 19th, | नेपच्यून ग्रह १९ ला येणार पृथ्वीजवळ, प्रतियुती ही खगोलीय घटना;

नेपच्यून ग्रह १९ ला येणार पृथ्वीजवळ, प्रतियुती ही खगोलीय घटना;

googlenewsNext

अमरावती : सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून हा १९ सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह सूर्यासमोरही राहणार आहे. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या काळात पृथ्वीपासून ग्रहांचे सरासरी अंतर कमी असल्याने चांगल्या टेलिस्कोपद्वारे अवलोकन करता येणार आहे.
पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहाला १६५ वर्षे लागतात व स्व:तभोवती एक फेरी तो १६ तासात पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहेत. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८६०० किमी आहे व भुपृष्ठाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सिअस आहे.

२४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर-२ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर ४५२ कोटी किमी किंवा ३०.१ खगोलीय एकक आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नसल्याची खगोल अभ्यासकांनी दिली.

फिकट निळ्या रंगाचा ग्रह
या ग्रहाचे निरीक्षण केले असता. फिकट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो. १९ सप्टेंबरला हा ग्रह पूर्व क्षितीजावर उगावेल व पश्चिमेकडे मावळेल. रात्रभर आकाशात हा ग्रह दिसेल. मात्र साध्या डोळ्यांनी हा ग्रह पाहता येणार नाही तर याकरिता शक्तिशाली दुर्बिनची आवश्यकता असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी सांगितले.

Web Title: Neptune will come close to Earth on the 19th,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.