नवीनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त
By प्रदीप भाकरे | Updated: December 13, 2022 23:37 IST2022-12-13T23:35:56+5:302022-12-13T23:37:19+5:30
गृहविभागाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील १५ वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

नवीनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त
अमरावती: आयपीएस नवीनचंद्र रेड्डी हे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त असतील. तर मावळत्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची बृह्नमुंबईस्थित सशस्त्र पोलीस विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
गृहविभागाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील १५ वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तपदी सध्या नागपूर शहर आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त असलेले नवीनचंद्र रेडडी यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. ते बुधवारी मध्यान्हापुर्वी पदभार स्वीकारण्याचे संकेत आहेत. डॉ. आरती सिंह यांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी शहर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचा सव्वा दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वी असा ठरला.