राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं खड्ड्यांविरोधात आंदोलन, रास्ता रोकोकरून सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 15:47 IST2017-12-16T15:47:01+5:302017-12-16T15:47:11+5:30
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं खड्ड्यांविरोधात आंदोलन, रास्ता रोकोकरून सरकारचा निषेध
अमरावती- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १५ डिसेंबरनंतरही हे सरकार आश्वासनांची पूर्तता करू शकले नाही. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहरतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शुभम शेगोकर यांच्या नेतृत्त्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा राठोड व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुड्डू ढोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
यावेळी विकास ऊर्फ बाळासाहेब तांबसकर, चेतन अडोकार, महेश सिंडामे, निलेश वानखेडे,धिरज शिंदे,पबन ढोबळे, कपिल वसुले,क्षितिज सडसे,पवन जयसिंगपूरे,रवि नवले, केशव माने, किशोर टेकाडे प्रेम हेले व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.