१० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:51+5:302021-03-05T04:13:51+5:30
अमरावती : न्यायालयात प्रलंबीत असलेले खटले, दाखल न झालेली प्रकरणे आपसी तडजोडीने व सामजस्यातून मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन १० ...

१० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत
अमरावती : न्यायालयात प्रलंबीत असलेले खटले, दाखल न झालेली प्रकरणे आपसी तडजोडीने व सामजस्यातून मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस. जोशी (फलके) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.जी. संतानी यांनी केले आहे.
आपली प्रकरणे आपसी तडजोडीने व सामजस्यांने मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ (पॅनेल) मदत करणार आहे. त्यामुळे आपले तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोकअदालत समक्ष ठेवण्यासाठी संबधीत न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या संबधीत जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे सपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आयोजनासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावी लागणार नाही.