शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस आजपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:11 IST

अमरावती : रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. ...

अमरावती : रेल्वे प्रशासनाने ‘ऑरेंज बेल्ट’ भागासाठी सुरू केलेली नरखेड ते काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. कोरोनाकाळात काचीगुडा एक्स्प्रेस बंद होती, पण, नंतर सुरू झाली. दरम्यान प्रवासी संख्येअभावी तात्पुरते बंद करण्यात आली होती. आता काचीगुडा- नरखेड-काचीगुडा एक्स्प्रेस १४ जानेवारीपासून नव्याने सुरू होत आहे.

नरखेड, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, रिद्धपूर,मोवाड, पुसला, बेनोडा, पाळा, हिवरखेड, आष्टेगाव, कोळविहीर, शिराळा, वलगाव आदी भागांतील शेतीमाल, धान्याची ने-आण दिल्ली, मुंबई, हावडा या प्रमुख शहरात करण्याच्या उद्देशाने नरखेड रेल्वे मार्ग निर्माण करण्यात आला. याच मार्गावरून अन्य रेल्वे गाड्या, मालवाहू गाड्या धावतात. मात्र, कोरोनाकाळात नरखेड रेल्वे मार्ग निर्मनुष्य झाला होता. या मार्गावरील रेल्वे स्थानके ओस पडली होती. परंतु, आता मध्य रेल्वे भुसावळ विभागाने नरखेड मार्गवरील काचीगुडा एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काचीगुडा- नरखेड (गाडी क्रमांक ०७६४१) ही गाडी १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०७६४२) ही गाडी १५ जानेवारी रोजी नरखेड येथून धावणार आहे. या गाडीत आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

----------------------

अमरावती- मुंबई २२ पासून सुरु होण्याचे संकेत

मार्चपासून बंद असलेली अमरावती- मुंबई एक्स्प्रेस २२ जानेवारीपासून सुरू करण्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. मुंबई एक्स्प्रेसचे डबे, वॉशिंग, कर्मचारी, चालक आदींबाबतची माहिती वरिष्ठांनी मागविली आहे. पश्चिम विदर्भातील प्रवाशांच्या मागणीनुसार खा. नवनीत राणा यांनी रेल्वे बोर्डाला मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. ही गाडी सुरू झाल्यास मुंबईला ये-जा करणे सोयीचे होणार आहे.