नगरपंचायती करणार नरेगाची कामे

By Admin | Updated: May 29, 2015 00:30 IST2015-05-29T00:30:32+5:302015-05-29T00:30:32+5:30

नगरपंचायती करणार नरेगाची कामेरुपांतरित करण्याचे निर्देश नियोजन विभागाने २१ मे रोजी दिले.

NAREGA's work to do the Nagar Panchayat | नगरपंचायती करणार नरेगाची कामे

नगरपंचायती करणार नरेगाची कामे

अमरावती : नगरपंचायती करणार नरेगाची कामेरुपांतरित करण्याचे निर्देश नियोजन विभागाने २१ मे रोजी दिले. मात्र तहसीलदारांनी याविषयी गांभीर्याने घेतले नसल्याने विहिरीसह अन्य योजनांचे लाभार्थींना अडचणी येत आहेत.
जिल्ह्यात मागील महिन्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी या तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती स्थापित करण्यात आल्या आहेत. या नगरपंचायतींच्या क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ती कामे राज्य रोजगार हमी योजनेत रूपांतरित करावी व त्या कामासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून निधी खर्च करावा या विषयीचे आदेश नियोजन विभागाच्या उपसचिव आर. विमला यांनी २१ मे रोजी जारी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित करावे व अशा कामांसाठी पूर्वीचेच जॉबकार्ड वापरण्यात यावेत, असे यामध्ये स्पष्ट निर्देश आहेत.
या क्षेत्रात विहिरींचा लाभार्थी वर्ग आहे. हे शेतकरी कामासंदर्भात आजही पंचायत समितीत चकरा मारीत आहे. पंचायत समितीद्वारा यापूर्वीच्या आदेशाने विहिरीसाठी साहित्य शेतात नेऊन ठेवले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना अनुदान मिळून विहिरींचे कामे होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: NAREGA's work to do the Nagar Panchayat