नांदगावला २०० पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST2021-08-29T04:15:16+5:302021-08-29T04:15:16+5:30
ऑलिम्पिकपर्यंत मजल एकलव्य अकादमीची खेळाडू साक्षी विनोद तोटे ही २०१९-२० मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळली. कामगिरीच्या बळावर तिची टोक्यो ऑलिम्पिकच्या ...

नांदगावला २०० पदके
ऑलिम्पिकपर्यंत मजल एकलव्य अकादमीची खेळाडू साक्षी विनोद तोटे ही २०१९-२० मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळली. कामगिरीच्या बळावर तिची टोक्यो ऑलिम्पिकच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड झाली. मात्र, दुखऱ्या हातामुळे संघात सहभागी होण्याची संधी तिला मिळाली नाही.
अशी मिळविली पदके
एकलव्य क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी १९९८ ते २०१८ दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेत ६६ सुवर्ण, ५९ रौप्य, ४९ कांस्यपदके मिळविली आहेत. याच कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये २०८ सुवर्ण, १३४ रौप्य व १४९ कांस्य अशी ४९१ पदके खेळाडूंनी मिळविली. याशिवाय १६ खेळाडू राष्ट्रीय पातळीवर योगटू आहेत. एकलव्य गुरुकुल स्कूलचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, योगशिक्षक अनूप काकडे, विशाल ढवळे, पवन जाधव व अकादमीचे सर्व पदाधिकारी व खेळाडू परिश्रम घेत आहेत.