शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माफीचा साक्षीदार सचिन वाझे ही भाजपची ‘स्क्रिप्ट’; नाना पटोलेंची खोचक टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 17:33 IST

‘खोटे बोला; पण रेटून बोला,’ असा चंग भाजपने बांधला आहे. परंतु, कॉंग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सचिन वाझेप्रकरणी जे काही वास्तव असेल, ते नक्कीच पुढे येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र

अमरावती : १०० कोटी वसुलीप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ही भाजपची ‘स्क्रिप्ट’ होती. आता वाझे हा माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षड्यंत्र होते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केली.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात धनगर कार्यकर्ता परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पटोले म्हणाले, सचिन वाझे हे प्रकरण पूर्णत: बनावट आहे. हे मी विधानसभा अध्यक्ष असताना त्यावेळी भाजपचे नेते ज्या पद्धतीने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते, तेव्हा लक्षात आले होते. मात्र, विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे मला याविषयी मत नोंदविता आले नाही, तथापि, वाझे प्रकरणातून राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कुटील डाव भाजपने रचला. म्हणूनच सचिन वाझे याचा १ जून राेजी विशेष सीबीआय न्यायालयाने ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी अर्ज मंजूर केला, अशी टिप्पणी त्यांनी केली.

खोटी व्यवस्था निर्माण करण्यात भाजपचा हातखंडा आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करायचे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला,’ असा चंग भाजपने बांधला आहे. परंतु, कॉंग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सचिन वाझेप्रकरणी जे काही वास्तव असेल, ते नक्कीच पुढे येईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर कॉंग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई देसाई, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, ॲड. दिलीप एडतकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसsachin Vazeसचिन वाझेBJPभाजपा