३५ फूट खोल विहिरीतून काढला नाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST2021-09-22T04:14:21+5:302021-09-22T04:14:21+5:30
तळणी : मोर्शी तालुक्यातील तळणी येथील कार्स युनिटच्या सर्पमित्राने ३५ फूट खोल विहिरीतून नाजा या कोब्रा नागाच्या उपप्रजातीच्या सापाला ...

३५ फूट खोल विहिरीतून काढला नाजा
तळणी : मोर्शी तालुक्यातील तळणी येथील कार्स युनिटच्या सर्पमित्राने ३५ फूट खोल विहिरीतून नाजा या कोब्रा नागाच्या उपप्रजातीच्या सापाला काढून नैसर्गिक परिवासात सोडण्यात आले. तळणी येथील स्वप्निल पापडकर यांनी १९ सप्टेंबर रोजी त्यांच्या मालकीच्या विहिरीत साप असल्याची माहिती कार्सच्या मोर्शी युनिटचे कार्यकारी प्रमुख अक्षय लुंगे यांना दिली. त्यांनी सहकारी शुभम पाचारे, जय नांदणे, हरी कुरवाडे यांना घटनास्थळी रवाना केले. विहिरीत एका पाईपमध्ये दडून बसलेला साप हा नाजा होता. चार फुटाच्या या नागाला हाताने बाहेर काढून वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले.
नागाची पोटजात ही नाजा म्हणून ओळखली जाते. हा विषारी आहे आणि प्राणघातक आहे. सामान्यपणे उंदीर आणि निवारा शोधण्यासाठी मानवी वस्तीच्या सभोवताल राहतो, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.