नायब तहसीलदाराला मारहाण प्रकरणाचा निषेध
By Admin | Updated: October 26, 2015 00:36 IST2015-10-26T00:34:21+5:302015-10-26T00:36:26+5:30
बुलडाणा येथील नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक बी.के सुराडकर यांना चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांनी मंगळवारी मारहाण केल्याप्रकरणी ..

नायब तहसीलदाराला मारहाण प्रकरणाचा निषेध
निवेदन : संघटनेची कारवाईची मागणी
अमरावती : बुलडाणा येथील नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक बी.के सुराडकर यांना चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांनी मंगळवारी मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने शनिवारी तीव्र निषेध व्यक्त केला. याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, अरविंद माळवे, सचिव रवी महाले, महिला प्रतिनिधी नीता लबडे व तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)