तिवसा नगरपंचायतीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 12:07 IST2022-01-19T12:01:07+5:302022-01-19T12:07:54+5:30
Nagar Panchayat Election 2022 : तिवसा नगरपंचायतीत १२ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.

तिवसा नगरपंचायतीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम
अमरावती : तिवसा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रसने आपले खाते उघडले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली सत्ता राखली आहे. तिवस्यात काँग्रेसने १२ जागांवर आपला विजय मिळवला आहे.
तिसवा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यातील १२ जागा काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. शिवसेनेला ४ जागा, वंचितला १ जागा मिळाली असून भाजप राष्ट्वादीला भोपळाही फोडता आलेला नाही. दरम्यान, मागील वेळी तिवसामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची तर भातकुलीमध्ये होती आमदार रवी राणा यांची सत्ता होती. यावेळी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे.
दरम्यान, तिवसा नगरपंचायतीच्या ३ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. एकूण १७५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ९०३ पुरुष तर ८५५ महिलांनी मतदान केले.