म्युकरमायकोसिस संपर्कातून होत नाही, जिल्ह्यात १५५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:21+5:302021-05-30T04:11:21+5:30
अमरावती : कोरोना आजारात सहव्याधीच्या रुग्णांना अधिक प्रमाणात स्टेराॅईड दिल्याने काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. मात्र, ...

म्युकरमायकोसिस संपर्कातून होत नाही, जिल्ह्यात १५५ रुग्ण
अमरावती : कोरोना आजारात सहव्याधीच्या रुग्णांना अधिक प्रमाणात स्टेराॅईड दिल्याने काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहेत. मात्र, हा आजार संसर्गाने होत नसून, कोरोनापश्चात प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तिंनाच होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात सद्यस्थितीत या आजाराचे १५५ रुग्ण आहेत. दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
शासनस्तरावर या आजाराला अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतले जात आहे. या आजाराचा रुग्ण असल्यास त्यांना तत्काळ उपचार करण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रतिकार क्षमतेवर अवलंबून असलेला हा आजार प्रत्येकालाच होतो, असे नाही. याशिवाय हा आजार संसर्गजन्यदेखील नाही. वैयक्तिक स्वच्छतेसह काळजी घेतल्यास उपाययोजनांनी हा आजार निश्चित बरा होत असल्याचे आरोग्य यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.
कोरोनाग्रस्तांना उपचारादरम्यान स्टेराॅईडचा वापर, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या बाटल्यांमध्ये डिस्टिल वॉटरऐवजी साध्या पाण्याचा वापर व अनियंत्रित मधुमेह यासह अनेक कारणांमुळे हा आजार होतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.
अलीकडे या आजाराचे अधिक रुग्ण नोंद झाल्याने ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे, अशा व्यक्तींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकतर या आजारावरील औषधी व इंजेक्शन महागडे आहे व बाजारात तुटवडादेखील आहे. सध्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना या आजारावरील इंजेक्शन सहज उपलब्ध आहे. एका दिवशी तीन ते सहा इंजेक्शन द्यावे लागतात. या आजाराचे रोज किंवा एका दिवसाआड तरी रुग्ण आढळत असल्याचे नाक, कान घसा तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
बॉक्स
ॲम्फोटेसेसिनचा तुटवडा
* या आजाराचे शासकीय पेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये अधिक रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
* या आजारावरील खर्च अधिक असल्याने शासनाने माहात्मा फुले जनआरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे.
* जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराचे इंजेक्शन उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांना रकमेचा भरणा करून पुरवठा करण्यात येतो.
पाईंटर
१५५ रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराची नोंद
४० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
बॉक्स
आजाराची प्राथमिक लक्षणे
नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक दुखणे, नाकावाटे रक्त येणे, ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. याशिवाय डोळ्यांची नजर हटणे, समोरचे दोन दात दुखणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, डोळ्यांना सूज येणे, हे आजाराचे दुसरे लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास डोळ्यावाटे थेट मेंदूत जाऊ शकतो. त्यामुळे सतत डोके दुखणे हे आणखी एक लक्षण आहे. मेंदूपर्यंत हा आजार पोहोचणे धोकादायक मानले जाते.
बॉक्स
ही घ्या काळजी
रुग्णांनी साखर नियंत्रणात ठेवणे आणि स्टेराॅईडचा वापर कमी प्रमाणात झाल्यास म्युकरमायकोसिसचा आजार टाळता येऊ शकतो. या आजाराचे बहुतेक रुग्ण मधुमेही आहेत व ज्यांचा एचआरसीटी स्कोअर अधिक होता, अशा रुग्णांनी नाक, तोंड दातांसह शरीराची स्वच्छता राखावी. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नियमित योगा व विश्रांती व औषधी घ्याव्यात.
कोट
डॉक्टर म्हणतात
कोट (१) आणि (२)