शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सत्ताधीशांंभोवती चक्रव्यूह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:33 IST

सत्ताधिशांच्या ‘खास गोटातली’ म्हणून विरोधकांच्या ‘मनात’ घर करणाºया पुण्याच्या एका कंपनीविरुद्ध महापालिकेत जोरदार चक्रव्यूह रचले जात आहे.

ठळक मुद्देकंत्राट रद्दची पत्रे व्हायरल : दैनंदिन स्वच्छतेच्या निविदेवर लक्ष

आॅनलाईन लोकमतअमरावती : सत्ताधिशांच्या ‘खास गोटातली’ म्हणून विरोधकांच्या ‘मनात’ घर करणाºया पुण्याच्या एका कंपनीविरुद्ध महापालिकेत जोरदार चक्रव्यूह रचले जात आहे. ते चक्रव्यूह वरवर ‘त्या’ कंपनीसाठी रचले जात असल्याचे चित्र निर्माण केले असले तरी त्यामागे सत्ताधिशांमधील काहींचा सुसाट निघालेला वारू रोखण्याची भूमिका आहे.सत्ताधिशांमधील काहीजण ‘तिच्या’साठी आग्रही असल्याचा आरोप करत तिचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी एका आघाडीने बाहू सरसावले आहेत. त्या कंपनीच्या ‘कंत्राट रद्द’ची पत्रे मिळवून ती समाजमाध्यमातून व्हायरल करण्यात आली आहेत. त्या कंपनीनेही ३० कोटी रुपये अंदाजित खर्च असणाºया दैनंदिन स्वच्छतेच्या कंत्राटात ‘रस’ दाखविल्याने तिचा संभाव्य प्रवेश रोखण्यासाठी एका माजी महापौरांच्या खास गोटातील माणसे कामाला लागली आहेत.दैनंदिन स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय कंत्राटदारांऐवजी एक कंपनी असावी, या भूमिकेचा सत्ताधिशांनी पुरस्कार केला. ते एका विशिष्ट कंपनीला डोळ्यासमोर ठेवून प्रक्रिया राबवित असल्याचा आरोप करण्यात आला. आ.रवि राणा यांनी महापालिकेत १४ नोव्हेंबरला घेतलेल्या मॅराथॉन बैठकीत दैनंदिन स्वच्छतेचा कंत्राट पुण्याच्या ‘बीव्हीजी ’कंपनीला क सा देता ? अशी थेट विचारणाच आयुक्त हेमंत पवार यांना केली होती. २९ नोव्हेंबरच्या ‘प्री -बीड ’ मिटींगमध्ये या कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्या अनुषंगाने निविदा भरल्यास अटी -शर्तीच्या अधीन राहून ती कंपनी तांत्रिक बीडमध्येच अपात्र कशी ठरविली जाईल, यासाठी जुळवाजुळव सुरु करण्यात आली आहे.१३ नोव्हेंबरला दैनंदिन स्वच्छतेच्या २९.३८ कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी पात्र कंपन्याकडून निविदा बोलावण्यात आल्या. ११ डिसेंबरला या निविदेची तांत्रिक बीड उघडण्यात येईल. एखाद्या ठिकाणी संबंधित निविदाधारक कंपनीचा कंत्राट रद्द केला असेल, ती कंपनी पात्र ठरणार नाही, अशी निविदेतील अट असल्याने त्या कंपनीची निविदा पात्र ठरविली गेल्यास प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.आ.रवि राणासुद्धा या प्रक्रियेवर सुक्ष्म लक्ष ठेऊन आहेत.प्रशासनासमक्ष पारदर्शकतेचे आव्हान२९.३८ कोटी रुपयांची ही निविदा भरणारी कंपनी वा निविदाधारकांवर याआधी कुठल्याही शासकीय वा निमशासकीय संस्थाकडून कंत्राट रद्दची कारवाई झाली असल्यास ती कंपनी या निविदेसाठी पात्र ठरणार नाही, अशी अट निविदेत अंतर्भूत आहे. त्यामुळे निविदेतील अटी शर्तीना अधीन राहून त्या कंपनीची निविदा अपात्र ठरवायची की दबावात येऊन पळवाट शोधायची ,हे दिव्य आयुक्तांसमोर आहे.तीन ठिकाणी त्या कंपनीचे कंत्राट रद्दपुणे मुख्यालय असलेल्या या कंपनीचा कंत्राट तीन ठिकाणी रद्द करण्यात आल्याची कागदपत्र हाती आली आहेत. स्वच्छतेचे कामकाज असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत या कंपनीकडून दंड वसूल करण्यात आला आहे. अन्य ठिकाणी बँक गॅरंटी जप्त केली आहे. एका केंद्रशासित प्रदेशासह श्रीरामपूर नगरपरिषद व एका महापालिकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईने महापालिकेतील या कंपनीचा संभाव्य प्रवेश रोखण्यात येणार आहे.