शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
3
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
4
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
5
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
6
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
7
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
8
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
9
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
10
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
11
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
12
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
13
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
14
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
15
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
16
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
17
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
18
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
19
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
20
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....

रिंगरोड ढाब्यावर तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:01 IST

हॉटेल बंद असल्याने जेवण देता येणार नाही, असे म्हटल्याने त्या दोघांनी बिरे यांच्याशी वाद घातला. प्रसाद देशमुख व हॉटेलमधील वेटर दीपक आठवले हे वाद सोडविण्याकरिता गेले असता, दोनपैकी एका आरोपीने प्रसादच्या डाव्या मांडीवर चाकूने वार केला.  त्यातसमीर देशमुख व आठवलेदेखील जखमी झाले.  घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री प्रसादचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ढाबा बंद असताना भोजनाचा आग्रह धरणाऱ्या दोन आरोपींनी २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली.  रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद विनोद देशमुख (२४, रा. पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत समीर रत्नाकर देशमुख (५०, रा. विद्युतनगर) व दीपक आठवले (२८, रा. महाजनपुरा) हे जखमी झाले. याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिद्धांत गुलाबराव वानखडे (२३) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, दोघेही रा. शेगाव, अमरावती) यांना अटक करण्यात आली.  त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली. त्यानुसार, समीर व प्रसाद हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. मात्र, ढाबा बंद असल्याने या दोघांनी संचालक शेखर बिरे यांना हॉटेलवर बोलावून घेतले. बिरे आल्यानंतर त्यांच्याशी बोलत असताना दोन अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले व त्यांनी बिरे यांना जेवण मागितले. हॉटेल बंद असल्याने जेवण देता येणार नाही, असे म्हटल्याने त्या दोघांनी बिरे यांच्याशी वाद घातला. प्रसाद देशमुख व हॉटेलमधील वेटर दीपक आठवले हे वाद सोडविण्याकरिता गेले असता, दोनपैकी एका आरोपीने प्रसादच्या डाव्या मांडीवर चाकूने वार केला.  त्यातसमीर देशमुख व आठवलेदेखील जखमी झाले.  घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री प्रसादचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शहरात रात्री १० ते ११ वाजेपर्यंत ढाबे सुरू राहतात अन् तेथे भोजन दिले जाते कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाणेदार मुख्यालयातढाबा परिसरात उशिरा जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी मुख्यालयाशी संलग्न केले, तर बिट इंचार्ज सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांना दिला आहे. 

ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ठाणेदारांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित करण्यात आले. - आरती सिंह, पोलीस आयुक्त

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस