अमरावतीत युवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 01:29 IST2019-09-15T01:29:45+5:302019-09-15T01:29:52+5:30
उत्तम नगर गल्ली नंं. 2 मधील रहिवासी असलेला युवक भूषण भांबुर्डे (20) याची क्षुल्लक कारणावरून चार अज्ञात युवकांनी चाकूने भोसकून हत्या केली.

अमरावतीत युवकाचा खून
अमरावती : शहरातील उत्तम नगर गल्ली नंं. 2 मधील रहिवासी असलेला युवक भूषण भांबुर्डे (20) याची क्षुल्लक कारणावरून चार अज्ञात युवकांनी चाकूने भोसकून हत्या केली. तेथीलच कमल राऊत यांच्या दवाखान्या पुढे एक पांढऱ्या कारनजीक शनिवारी उशीरा रात्री ही घटना घडली. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.