परतवाडा येथे भरदिवसा युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST2021-05-05T04:20:58+5:302021-05-05T04:20:58+5:30

फोटो पी ०३ परतवाडा हत्या परतवाडा : स्थानिक छोटा बाजार परिसरात भररस्त्यात ३२ वर्षीय युवकाचा अज्ञात इसमांनी खून केला. ...

Murder of a youth all day long at Paratwada | परतवाडा येथे भरदिवसा युवकाचा खून

परतवाडा येथे भरदिवसा युवकाचा खून

फोटो पी ०३ परतवाडा हत्या

परतवाडा : स्थानिक छोटा बाजार परिसरात भररस्त्यात ३२ वर्षीय युवकाचा अज्ञात इसमांनी खून केला. सोमवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान ही घटना घडली. विकी देविदास पवार (३२, रा. रविनगर, परतवाडा) असे मृताचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी लागलीच मृताला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल केले. त्याला दवाखान्यात पोलिसांनी मृतावस्थेत आणल्याची नोंद तेथील डॉक्टरांनी घेतली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून परतवाडा शहरातील २५ पॉईंटवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दंगा नियंत्रण पथकासह शिघ्र कृतीदल व राखीव पोलीस दल शहरात दाखल झाले आहे. जिल्ह्यातील लगतच्या पोलीस ठाण्यातूनही स्टाफ बोलाविण्यात आला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे परतवाड्यात दाखल झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी पी. जे. अब्दगिरे, ठाणेदार सदानंद मानकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्ह्याची नोंद केली नसली तरी पोलिसांना या घटनेतील आरोपींची माहिती मिळाली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेत आहेत.

विकी पवार हा एम एच २७ बी एम ६३३० या दुचाकीने छोटा बाजार परिसरातून जात असताना त्याचा अज्ञात आरोपींसोबत पैशाच्या कारणातून वाद झाला. यात आरोपीच्या मानेवर, डोक्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यात तो गंभीर जखमी झाला व जीव वाचवीत दुचाकीने काही अंतरावर जाऊन खाली कोसळला. घटनेची माहिती मिळताच परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

बॉक्स

सीसीटी फुटेज तपासणी, पावसाचा व्यत्यय

शहरात सायंकाळी ५ वाजतानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घटनेच्या तपासात मारेकरी कोण, याचा शोध घेण्यासाठी परतवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली आहे. आरोपी नेमके किती होते आणि हत्येचे कारण काय, याचा शोध सुरू आहे. यासंदर्भात परतवाडा पोलीस ठाण्यात मृत विकी पवार यांच्या कुटुंबीयांतफेर फिर्याद दाखल करणे सुरू होते.

कोट

छोटा बाजार परिसरातून दुचाकीने जात असताना विकी पवार याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आली. आरोपींचा शोध घेऊन तपास सुरू आहे.

- सदानंद मानकर,

ठाणेदार, परतवाडा

Web Title: Murder of a youth all day long at Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.