प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या; स्वत:लाही भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:32 IST2020-01-07T04:31:55+5:302020-01-07T04:32:14+5:30
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यानंतर हल्लेखोर तरुणाने स्वत:लाही भोसकून घेतले.

प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या; स्वत:लाही भोसकले
धामणगाव रेल्वे (अमरावती) : प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्यानंतर हल्लेखोर तरुणाने स्वत:लाही भोसकून घेतले. ही थरारक घटना येथील दादाराव अडसड क्रीडांगणात सोमवारी सकाळी घडली. सागर तितुरमारे (२८, रा. दत्तापूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याला यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. पोलिसांनी त्याच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. आहे.
जुना धामणगाव येथील तरुणी ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. महाविद्यालयात जात असताना दोघांच्यात बाचाबाची झाली. त्यादरम्यान सागरने सत्तूरसदृश तीक्ष्ण हत्याराने तिच्या पोटावर वार केले. त्यात ती रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. तिचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. प्रणिताचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सागरने स्वत:च्या पोटावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. मध्यवर्ती ठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणीचा दिवसाढवळ्या खून होत असताना कुणीही हल्लेखोराला थांबविले नाही.