दारूच्या नशेत वडिलांच्या गळ्यावर पाय ठेवून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 13:40 IST2020-07-16T13:40:20+5:302020-07-16T13:40:40+5:30

अंजनगाव सुर्जी शहरातील पान अटाई चौकात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील मुलाने गळ्यावर पाय ठेवून वडिलांचा खून केला. बापलेकात वाद विकोपाला गेल्यानंतर हे कृत्य घडले.

The murder was committed by putting his feet on the neck of his drunken father | दारूच्या नशेत वडिलांच्या गळ्यावर पाय ठेवून केला खून

दारूच्या नशेत वडिलांच्या गळ्यावर पाय ठेवून केला खून


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अंजनगाव सुर्जी शहरातील पान अटाई चौकात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील मुलाने गळ्यावर पाय ठेवून वडिलांचा खून केला. बापलेकात वाद विकोपाला गेल्यानंतर हे कृत्य घडले.

पोलीस सूत्रांनुसार, राजेंद्र रामदास विसळकर (रा. नेरपरसोपंत) असे मृताचे नाव आहे. पान अटाई चौकातील अकोटकर यांच्या घरात ते भाड्याने राहत होते. मुलगा सौरव राजेंद्र विसळकर (२०) याच्याशी मंगळवारी रात्री १२ नंतर राजेंद्र विसळकर यांचा वाद झाला. यावेळी दोघेही मद्यपान केलेले होते. वाद विकोपाला गेल्याने सौरवने राजेंद्र यांच्या गळ्यावर पाय ठेवला. श्वास घेता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे लक्षात येताच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

मृत्यूचे कारण उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळविले. बुधवारी अंत्यसंस्कारानंतर ठाणेदार विशाल पोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला. यावेळी सौरवचे कृत्य उघड झाले. सायंकाळच्या सुमारास याप्रकरणी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: The murder was committed by putting his feet on the neck of his drunken father

टॅग्स :Murderखून