पायावर थुंकल्याने केला मर्डर; १९ वर्षीय आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 22:27 IST2023-06-05T22:26:37+5:302023-06-05T22:27:00+5:30

Amravati News दाढी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाला रस्त्यावर थुंकणे महागात पडले. त्याची थुंकी पायावर पडल्याने संतप्त झालेल्या १९ वर्षीय युवकाने लोखंडी पाइपने डोक्यावर वार करून त्याला ठार केले.

Murder committed by spitting on feet; 19-year-old accused in custody | पायावर थुंकल्याने केला मर्डर; १९ वर्षीय आरोपी अटकेत

पायावर थुंकल्याने केला मर्डर; १९ वर्षीय आरोपी अटकेत

अमरावती : दाढी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवकाला रस्त्यावर थुंकणे महागात पडले. त्याची थुंकी पायावर पडल्याने संतप्त झालेल्या १९ वर्षीय युवकाने लोखंडी पाइपने डोक्यावर वार करून त्याला ठार केले. मिलचाळ परिसरात ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. बडनेरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, राहुल जनार्दन वसुकर (३५, दोघेही रा. मिलचाळ, नवीवस्ती) असे मृताचे, तर सिद्धांत उमेश डोंगरे (१९) असे आरोपीचे नाव आहे. राहुल हातमजुरीचे काम करीत होता. तो सोमवारी सकाळी ११ वाजता दाढी करून घेण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने पत्नी वैशालीने त्याला दुपारी दीडच्या सुमारास कॉल केला. फोनवर बोलत घरी येत असतानाच मिलचाळ परिसरात राहुल व सिद्धांत हे एकमेकांसमोरून विरुद्ध दिशेने निघाले. यावेळी राहुल थुंकला. त्याची थुंकी पायावर गेल्याने आरोपीने त्याच्याशी बाचाबाची केली आणि मंडपाचा लोखंडी पाइप उगारून तो डोक्यावर तसेच पायावर मारला. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. तेवढ्यात राहुलची पत्नी घटनास्थळी पोहोचली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. राहुलला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी आरोपी सिद्धांतला अटक केली आहे. त्याने पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, राहुलच्या खुनामागे केवळ थुंकण्याचे कारण आहे का, याचादेखील ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात बडनेरा पोलिस तपास करीत आहेत. या घटनेतील आरोपी तापट स्वभावाचा असल्याचेदेखील पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Murder committed by spitting on feet; 19-year-old accused in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.