महापालिकेचे ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST2021-03-06T04:12:47+5:302021-03-06T04:12:47+5:30
अमरावती : महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ मोहीम आरंभली आहे. शुक्रवारी शहरात नव्याने सहा लसीकरण केंद्रे सुरू केले. त्यामुळे ...

महापालिकेचे ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम
अमरावती : महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ मोहीम आरंभली आहे. शुक्रवारी शहरात नव्याने सहा लसीकरण केंद्रे सुरू केले. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील को-मॉर्बेडिटी रूग्ण आणि ज्येष्ठांना लसीकरण करणे सुकर होणार आहे.
महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंत महाविद्यालय येथे ज्येष्ठांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी नव्याने आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान, बडनेरा येथे मोदी हॉस्पिटल, भाजीबाजार येथील शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्य केंद् दस्तुरनगर, मनपा शाळा नागपुरी गेट हे सहा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेला गतिमान करण्यासाठी महापौर चेतन गावंडे यांच्या उपस्थितीत भाजीबाजार येथे आझाद हिंद मंडळाचे सभासद प्रकाश संगेकर व नीळकंठ मंडळाचे सभासद प्रमोद गंगात्रे यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी आयुक्त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, विवेक कलोती, नगरसेवक आशिष अतकरे, उपायुक्त रवि पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते.
बडनेरा स्थित मोदी हॉस्पिटल येथे माजी मुख्याध्यापक भास्करराव कुळकर्णी यांना लस देऊन कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, आयुक्त प्रशांत रोडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी नगरसेवक प्रकाश बनसोड, गंगा अंभोरे, मोहम्मद इमरान, सहायक आयुक्त विशाखा मोटघरे, सई कुळकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. शहरी आरोग्य केंद्र दस्तुरनगर येथे लस घेऊन सदर केंद्राच्या लसीकरण मोहिमेत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डाहाके यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रभा गणोरकर, नानक आहुजा यांनीही लस घेतली. यावेळी नगरसेवक ऋषी खत्री, मोना चिमोटे, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, प्रतिभा आत्राम उपस्थित होत्या.
-------------------