पोलीस आयुक्तांकडून महापालिका अग्निशामक कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:47+5:302021-03-17T04:14:47+5:30
विहिरीतृून चार वर्षीय बालकाला काढले सुखरूप, समाजहिताचे कर्तव्य बजावले अमरावती : स्थानिक अभिनव कॉलनीतील साईतीर्थ अपार्टमेंटजवळील एका विहिरीत १३ ...

पोलीस आयुक्तांकडून महापालिका अग्निशामक कर्मचाऱ्यांचा गौरव
विहिरीतृून चार वर्षीय बालकाला काढले सुखरूप, समाजहिताचे कर्तव्य बजावले
अमरावती : स्थानिक अभिनव कॉलनीतील साईतीर्थ अपार्टमेंटजवळील एका विहिरीत १३ मार्च रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास साडेचार वर्षीय चिमुकला कोसळला. त्याला वाचविण्यासाठी वडिलांनीही विहिरीत उडी घेतली. या दोघांना सुखरूप काढण्यात महापालिका अग्निशमन विभागाने अतुलनीय कामगिरी बजावली. परिणामी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी मंगळवारी या चमूचा गौरव केला.
अभिषेक निंभोरकर, सूरज लोणारे, अमोल साळुंखे, हर्षद दहातोंडे या अग्निशमन दलाच्या जवानांना पोलीस आयुक्त सिंह यांनी कार्यालयात पाचारण केले आणि त्यांचा संयुक्तपणे गौरव केला. उत्कृष्ट कार्य केल्याबाबत पोलीस विभागाकडून चारही कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. महापालिका अग्निशमन दलाने चार वर्षीय बालिक मनस्व आणि त्याचे ३८ वर्षीय वडील मनीष मानकर यांना ७० फूट खोली असलेल्या विहिरीतून सुखरूप काढण्यासाठी यशस्वी धडपड केली. पोलीस आयुक्तांकडून सत्कार हा बहुमानच आहे, अशा प्रतिक्रिया अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.