मडकी खोऱ्यात वणवा धुमसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:26 IST2018-05-11T22:26:23+5:302018-05-11T22:26:23+5:30
गत महिन्याभरापासून मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी आगडोंब उसळल्याचे चित्र असताना, गुरुवारी रात्रीपासून मडकी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जंगल जळून राख झाल्याचे चित्र आहे

मडकी खोऱ्यात वणवा धुमसला
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : गत महिन्याभरापासून मेळघाटच्या वन आणि व्याघ्र प्रकल्पात ठिकठिकाणी आगडोंब उसळल्याचे चित्र असताना, गुरुवारी रात्रीपासून मडकी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत जंगल जळून राख झाल्याचे चित्र आहे
चिखलदरापासून आठ किलोमीटर अंतरावरील धामणगाव गढी ते परतवाडा मार्गावर असलेल्या मडकी खोऱ्यात आग लागली आहे. पूर्व मेळघाट वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या संरक्षित जंगलात आग लावण्यात आल्याचीही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होती. दुग्धव्यवसाय करणाºयांकडून जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लावण्यात येत असल्याचे अनेकदा आतापर्यंत सिद्ध झाले आहे. उन्हाळ्यात जंगलात आग लागली की, पशुखाद्य समजले जाणारे गवत मोठ्या प्रमाणात उगवत असल्याने ही आग जंगलात जाणून-बुजून लावण्यात येते.
मळकी खोऱ्यात लागलेली आग आटोक्यात येत असून, वनमजूर, अंगारी, वनकर्मचारी, आपण स्वत: घटनास्थळी आग विझवीत आहोत.
- डी.के. मुनेश्वर
वनपरिक्षेत्र अधिकारी,