चिखलदऱ्यात दूषित पाणी!

By Admin | Updated: March 26, 2017 00:10 IST2017-03-26T00:10:53+5:302017-03-26T00:10:53+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे अप्पर प्लेटो भागात जीवन प्राधिकरणामार्फत केला जाणारा .....

Muddy water polluted! | चिखलदऱ्यात दूषित पाणी!

चिखलदऱ्यात दूषित पाणी!

पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष : जलजन्य रोगांची लागण, नगरसेविकेची तक्रार
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे अप्पर प्लेटो भागात जीवन प्राधिकरणामार्फत केला जाणारा पाणीपुरवठा दूषित, दुर्गंधीयुक्त असून यामुळे अनेकांना जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चिखलदरा शहर दोन टप्प्यात वसले असून, अप्पर प्लेटो परिसरातील पांढरी, रेंजर कॉलेज, विश्रामगृह परिसराला मागील १५ दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात जीवन प्राधिकरणासह संबंधित कार्यालयाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई होत नसल्याची तक्रार नगरसेविका सुनीता इग्रपवार यांनी केली आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी )

जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त : सतत दूषित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांना नाइलाजास्तव पिण्यासाठी त्याच पाण्याचा वापर करावा लागत आहे. परिणामी अनेकांना अतिसार, अंगावर पांढरे डाग, खाज सुटणे, अशा प्रकारचे आजार झाले आहेत. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.

पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल
जीवन प्राधिकरण विभागामार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णत: दूषित व पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोग शाळेत केलेल्या तपाणीत आढळून आले आहे. तरीसुद्धा दररोज दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, पाण्यामध्ये क्लोरीन, तुरटी टाकून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मागील १५ दिवसांपासून अप्पर प्लेटो परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना जलजन्य रोगाची लागण झाली आहे. जीवन प्राधिकरण व नगरपालिकेला पत्र दिले आहे. मात्र, त्यावर पूर्णत: दुर्लक्ष केल्या जात आहे.
- सुनीता इग्रपवार,
नगरसेविका, चिखलदरा

Web Title: Muddy water polluted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.