शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 5:00 AM

मुख्याधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी अवैध बांधकाम थांबविण्यासाठी आणि स्वत:हून अतिक्रमण मोकळे करण्यासाठी आदेश पारित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल करण्याचासुद्धा आदेशात उल्लेखत होता. मात्र, आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही बांधकाम अविरत सुरू ठेवून पहिल्या माळ्याचा स्लॅब मध्यरात्री उरकण्यात आला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन जिवंत आहे की मृतावस्थेत गेलेली आहे, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देबांधकाम सुरूच : एकच पाठीराखा नगरसेवक नगरपंचायतवर ‘लय भारी’

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरातील मुख्य मार्गावरील चंद्रलोक मार्केटसमोरील रस्त्यावर होणारे बांधकाम नगरपंचायतीसाठी आव्हान ठरले आहे . सर्वांदेखत दिवसभर पहिल्या माळ्याचे सेंट्रिंग बांधण्यात आले आणि नगरपंचायतीच्या नाकावर टिच्चून सोमवारी मध्यरात्री स्लॅब टाकून बांधकाम पूर्ण झाले. ‘त्या’ नगरसेवकाच्या धाडसाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे .एकीकडे नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाच्या घोषणा करीत असताना, थेट रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामाचे नियंत्रण एका नगरसेवकाने आपल्या हातात घेऊन ते पूर्ण केले. नगरपंचायतीने वेळोवेळी बजावलेल्या नोटीसचे सतत उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवून नगरपंचायतीवर एका नगरसेवकाने नामुष्कीची वेळ आणली. शुक्रवारी झालेल्या अंतिम आदेशानंतरसुद्धा शनिवार आणि रविवार दोन दिवसांत पहिल्या माळ्याचा स्लॅब रात्रीपर्यंत उरकून टाकण्यात त्या नगरसेवकाला यश मिळाले आहे .मुख्याधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी अवैध बांधकाम थांबविण्यासाठी आणि स्वत:हून अतिक्रमण मोकळे करण्यासाठी आदेश पारित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल करण्याचासुद्धा आदेशात उल्लेखत होता. मात्र, आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही बांधकाम अविरत सुरू ठेवून पहिल्या माळ्याचा स्लॅब मध्यरात्री उरकण्यात आला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन जिवंत आहे की मृतावस्थेत गेलेली आहे, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.नगरपंचायतमध्ये नियमित मुख्याधिकारी नाही. त्यामुळे चिखलदºयाच्या मुख्याधिकाऱ्यांकडे धारणी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आले. त्यांनी गुरुवार आणि शुक्रवारी धारणीत मुक्काम ठेकला. ते अतिक्रमण तोडून मोकळे करण्याचे आदेश शुक्रवारी संबंधित व्यावसायिकाला जारी करून निघून गेले. मात्र, त्यांच्या आदेशाचे सतत दोन दिवस उल्लंघन होत होते. आता मुख्याधिकाºयांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे फौजदारी कारवाई कोण करणार, असा सवाल आता धारणीकर विचारत आहेत. या प्रकरणामुळे शहरात अवैध बांधकांमांना ऊत येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.मुख्याधिकारी नॉट रिचेबलप्रस्तुत प्रतिनिधीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न दोन दिवसांपासून केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना सुरू असलेल्या घडामोडीचे छायाचित्र व्हॉट्सअप केल्यानंतरसुद्धा कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही. . त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ‘अर्थकारण’ भारी पडल्याचे निष्पन्न होत आहे .

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण