शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

दर्यापूरच्या श्री बालाजी जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:15 PM

अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगमध्ये बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून सुमारे तीन हजार क्विंटल कापूस जळाला.

ठळक मुद्देकोट्यवधींचे नुकसान : अग्निशमनचे पाच बंब दाखल

आॅनलाईन लोकमतदर्यापूर : अकोला मार्गावरील श्री बालाजी जिनिंगमध्ये बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून सुमारे तीन हजार क्विंटल कापूस जळाला. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दर्यापूरसह नजीकच्या तालुका मुख्यालयातून पाठविलेल्या पाच अग्निशमन बंबांनी नियंत्रणात आणली.श्री बालाजी जिनिंगच्या आवारात असलेल्या कापसाच्या पाच ढिगांना आग लागल्याचे दिसताच जिनिंगच्या संचालकांना अग्निशमन दलाला माहिती दिली. दर्यापूर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, एवढ्याने आग नियंत्रणात येणार नसल्याचे दिसताच नजीकच्या अंजनगाव सुर्जी, आकोट, मूर्तिजापूर, अचलपूर येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले. दरम्यान, आग वाढत असल्याने दर्यापूर नगर परिषदेच्या टँकरचा वापर करून नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.आग लागल्यानंतर धुरामुळे काही काळ अकोला मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. बघ्यांची गर्दी जमल्यानेही काही काळ वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळताच आ. रमेश बुंदिले, तहसीलदार अमोल कुंभार, एसडीपीओ सचिन हिरे, ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अग्निशमन वाहनांना मार्गात अडचण होणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घेतली.दरम्यान, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, शॉट सर्किट किंवा जिनिंगच्या पट्ट्याच्या ठिणगीने आग लागल्याचा अंदाज आहे.व्यापाऱ्यांची धावपळव्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी आणला होता. आग लागल्याचे कळताच जिनिंगच्या आवारातून मोटारी नेण्यासाठी लगबग झाली. व्यापाऱ्यांच्या तीन वाहनांना आग लागल्याची माहिती असून, त्यांनी आपला माल आवारातच फेकून दिला.कपासाच्या गंजीला आग कशामुळे लागली, याची माहिती मिळाली नाही. मात्र, कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.- नंदू सोमाणीसंचालक, श्री बालाजी जिनिंग