खासदारांची गुरुदेवनगर उपसा जलसिंचन प्रकल्पास भेट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:12 IST2021-03-18T04:12:57+5:302021-03-18T04:12:57+5:30
वंचित गावांना पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा, तिवसा : येथून जवळच असलेल्या गुरुदेवनगर येथील उपसा जलसिंचन प्रकल्पास मंगळवारी खासदार नवनीत ...

खासदारांची गुरुदेवनगर उपसा जलसिंचन प्रकल्पास भेट.
वंचित गावांना पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा,
तिवसा : येथून जवळच असलेल्या गुरुदेवनगर येथील उपसा जलसिंचन प्रकल्पास मंगळवारी खासदार नवनीत राणा यांनी आकस्मिक भेट दिली.
प्रकल्प परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी खासदार राणा यांच्याकडे अनेक दिवसांपासून जात होत्या. त्याच अनुषंगाने त्यांनी २०० कोटी रुपये खर्चून होत असलेल्या गुरुदेवनगर उपसा जलसिंचन प्रकल्पास भेट दिली व सदर प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. सिंचन सुविधेचा तपशील जाणून घेण्यात आला. सदर प्रकल्पांतर्गत एकूण २२ गावांना सिंचनाकरिता पाणीपुरवठा करण्यात येणार असून, या योजनेचा फायदा हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. २००९ साली मंजूर प्रकल्प येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी रासनकर यांनी दिली.
दरम्यान, प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या वऱ्हा, माळेगाव, सालोरा, धोतरा, शेंदोळा आदी गावांमधून नवनीत राणा यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वंचित गावांना पाणीपुरवठा करण्यासंदर्भात खासदारांनी निर्देश दिले. याप्रसंगी तहसीलदार वैभव फरतारे, जलसिंचन विभागाचे वानरे, युवा स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष धीरज केने, हर्षल रेवाने, आशिष कावरे, संदेश मेश्राम, पवन भोजने, भूषण हरणे, तुषार राऊतकर, संजय लांडे, प्रवीण लादे, संदीप चौधरी उपस्थित होते.