कुलूप तोडून घेतला खासदारांनी कार्यालयाचा ताबा; चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 03:26 PM2024-06-22T15:26:53+5:302024-06-22T15:27:41+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत जिल्ह्याच्या खासदारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आलेले आहे.

MPs broke the lock and occupied the office; Chandrakant Patel was told harsh words | कुलूप तोडून घेतला खासदारांनी कार्यालयाचा ताबा; चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल

कुलूप तोडून घेतला खासदारांनी कार्यालयाचा ताबा; चंद्रकांत पाटलांना सुनावले खडेबोल

अमरावती : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कुलूपबंद कार्यालयाचा ताबा मिळावा, यासाठी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतू १७ व्या दिवसांनतरही प्रशासनाद्वारे चावी देण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले व लगेच कुलूप फोडून कार्यालयाचा ताबा घेतला.
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत जिल्ह्याच्या खासदारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आलेले आहे. आचारसंहितेच्या काळात जिल्हा प्रशासनाने हे कार्यालय नवनीत राणा यांच्याकडून ताब्यात घेऊन त्याला कुलूप लावले होते. दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रक्रिया आटोपली व महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे विजयी झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी या कार्यालयाची मागणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे केली. 
 
त्यानंतर  वानखडे यांच्याद्वारे सातत्याने जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असतांना नियोजन विभागाने या कार्यालयाची चावी वानखडे यांना दिली नाही. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले. त्याचे एक दिवसपूर्व देखील चावी मागितली. मात्र प्रशासनाने दिली नसल्याने वानखडे व यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. त्यांनी पालकमंत्री यांना झालेला घटनाक्रम सांगितला. यावेळी आ. प्रवीण पोटे पाटील यांनी देखील मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, उपस्थित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी चावी विषयी चकार शब्द न काढल्याने  ठाकूर यांचा पारा चढला व आंदोलन करुन कुलूप फोडणार व काय गुन्हे दाखल करायचे ते करा, अशी तंबी प्रशासनाला दिली व शासन, प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करुन कार्यालयाचे कुलूप फोडले व कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी शहराध्यक्ष बबलू शेखावर, माजी, महापौर, विलास इंगोले, बाजार समितीचे  सभापती हरीष मोरे, प्रवीण मनोहर, वैभव वानखडे, योगेश देशमुख यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: MPs broke the lock and occupied the office; Chandrakant Patel was told harsh words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.