शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर...' नवनीत राणांनी शिवसैनिकांना सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 14:09 IST

हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने  हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

अमरावती : अमरावतीत हनुमान चालिसा वरून जोरदार राजकीय वातावरण तापलं आहे. काल युवा सेनेने राणा दाम्पत्याच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले होते. तर, आज शिवसेना मुख्यालय असलेल्या मुंबईतील 'मातोश्री' बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. देवाचं नाव घेणं गुन्हा असेल तर, जरूर माझ्या नावाने मुर्दाबादचे नारे लावावेत, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी शिवसैनिकांना खडे बोल सुनावले आहे. 

हनुमान जयंतीनिमित्त आज राणा दाम्पत्याने  हनुमान मंदिरात जाऊन पूजाअर्चना केली व हनुमान चालिसाचं पठण केलं. यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. संकटमोचक हनुमान आपल्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांनी तारीख आणि वेळ सांगावी, त्यादिवशी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करेन, अशा शब्दात नवनीत राणा यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडले आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.

आमच्या भावना आमचा धर्म जे सांगतो आम्ही त्याच पालन करतो व प्रचार करतो. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या विचारातून शिवसेना बनली, ती विचारधारा आज मातोश्रीत जीवंत आहे की नाही इतकंच मी म्हटलं होतं. त्यावरून मुर्दाबादचे नारे लावण्याची गरज नाही. यापेक्षा मातोश्रीच्या आत जाऊन मुख्यमंत्र्यांना आपल्या विचारांची आठवण करून द्यावी, असे नवनीत राणा म्हणाल्या. दोन वर्षानंतर ते मुख्यमंत्री कार्यालयात गेले तर १० मिनीटे वेळ काढून देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे, असा टोमणा नवनीत राणांनी यावेळी लगावला. 

राणा दाम्पत्यांस विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. मातोश्री हे आम्हाला मंदिरासमान आहे. जर, कोणी आमच्या देवळावर, मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर साहजिकच शिवसैनिक आक्रमक होतो, त्यामुळेच आज शिवसैनिक मातोश्रीबाहेर रस्त्यावर उतरला आहे, असे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी म्हटलं. दरम्यान, शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर केलेल्या गर्दीमुळे वांद्रे कलानगर परिसरात वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कार्यकर्त्यांना थोपविण्याचं काम पोलीस करत आहेत.  शिवसैनिकांचे राण दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. काल रात्री राणा दाम्पत्याच्या अमरावतीतील घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. तसेच लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा वाचून आंदोलन केले. ३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणHanuman Jayantiहनुमान जयंतीShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरे