'धमक असेल तर अमरावतीतून लढावे'; नवनीत राणा यांचं इम्तियाज जलील यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 11:14 IST2024-02-21T11:13:59+5:302024-02-21T11:14:42+5:30
इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, असे अशी नवनीत राणा यांनी टीका केली.

'धमक असेल तर अमरावतीतून लढावे'; नवनीत राणा यांचं इम्तियाज जलील यांना आव्हान
खासदार नवनीत राणा यांनी संसदेत 'इस देश मे रहना है, तो जय श्रीराम बोलना पडेगा' अशा आशयाचे विधान केले होते. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती. यावरून खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील हळदी कुंकू कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.
इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, असे अशी नवनीत राणा यांनी टीका केली. इम्तियाज जलील यांच्यात धमक असेल तर त्यांनी अमरावतीतून लढावे आणि निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही दिले. तसेच इम्तियाज जलील संभाजीनगरमध्ये यावेळेस कसे निवडून येतात हेच मी बघते, असं विधानही नवनीत राणा यांनी केलं.