मोझरीच्या मच्छिमार तरुणाचा वाघोली तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST2021-05-22T04:13:10+5:302021-05-22T04:13:10+5:30

तिवसा : मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या मोझरीतील एका मच्छिमार तरुणाचा माहुली जहागीर हद्दीतील वाघोली परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. ही ...

Mozari fisherman drowns in Wagholi lake | मोझरीच्या मच्छिमार तरुणाचा वाघोली तलावात बुडून मृत्यू

मोझरीच्या मच्छिमार तरुणाचा वाघोली तलावात बुडून मृत्यू

तिवसा : मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या मोझरीतील एका मच्छिमार तरुणाचा माहुली जहागीर हद्दीतील वाघोली परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

राहुल प्रल्हाद कुकडे (१९, रा. मोझरी) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मच्छिमार तरुणाचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल हा मासोळी विक्रीचा व पकडण्याचा व्यवसाय करीत होता. तो शुक्रवारी सकाळच्या सुमारास जावयासोबत माहुली जहागीर परिसरातील वाघोली येथील तलावावर मासोळ्या पकडण्यासाठी गेला होता. गुरुवारी या तलावात मासोळीसाठी राहुल ने जाळे टाकले होते.त्यांतर आज त्यातील मासोळ्या काढण्यासाठी पहाटे सात वाजताच्या सुमारास ते तलावावर गेले. थर्मोकोलच्या नावेवर बसून राहुल ने जाळ्यातील मासोळ्या काढण्यास सुरुवात केली असता, तो अचानक पाण्यात पडला आणि जाळ्यात अडकून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. राहुलच्या मृत्यूची बातमी कळताच मोझरी गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या चमूने एक तासाच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह शोधून तलावाबाहेर काढला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीचे सांत्वन केले.

Web Title: Mozari fisherman drowns in Wagholi lake