मालटेकडीहून दूरदर्शन केंद्र हलविले

By Admin | Updated: August 12, 2014 23:28 IST2014-08-12T23:28:37+5:302014-08-12T23:28:37+5:30

अमरावतीच्या मालटेकडीवर ३० वर्षांपूर्वी सुरु झालेले दूरदर्शन केंद्र आता आकाशवाणी केंद्रात समाविष्ट करण्यात आले आहे. दीड महिन्यांपासून यंत्र सामुग्री हलविण्याचे काम सुरु आहे.

Moving from Mahaltekadi to Doordarshan Kendra | मालटेकडीहून दूरदर्शन केंद्र हलविले

मालटेकडीहून दूरदर्शन केंद्र हलविले

आकाशवाणी केंद्रात समावेश : ३० वर्षांनंतर हक्काची जागा
राजेश जवंजाळ - अमरावती
अमरावतीच्या मालटेकडीवर ३० वर्षांपूर्वी सुरु झालेले दूरदर्शन केंद्र आता आकाशवाणी केंद्रात समाविष्ट करण्यात आले आहे. दीड महिन्यांपासून यंत्र सामुग्री हलविण्याचे काम सुरु आहे.
८ सप्टेंबर १९८४ साली केंद्रीय प्रसारण मंत्री वसंतराव साठे यांच्या हस्ते मालटेकडीवर (शिवटेकडी) दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी उषाताई चौधरी, सुरेंद्र भुयार, यशवंतराव शेरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दूरदर्शनचा दर्शकवर्ग काही दिवसांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात होता. २५ ते ३० किलो मिटर पर्यंत दूरदर्शन केंद्राची रेंज मिळावी, यासाठी हे केंद्र उंच टेकडी असलेल्या मालटेकडीवर सुरु करण्यात आले होते. येथे महापालिकेच्या इमारतीत केंद्र सुरु करण्यात आले होते.
दरम्यान केंद्र शासनाच्या प्रसार भारती विभागाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात आकाशवाणी केंद्र सुरु केले. आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राचे एकाच इमारतीत विलिनीकरणाचा निर्णय प्रसार भारतीने घेतल्याने मालटेकडी येथून हे केंद्र आकाशवाणी केंद्रात हलविण्याची प्रक्रिया २६ जून पासून सुरु करण्यात आली आहे. काही यंत्र सामूग्री अद्याप मालटेकडीच्या केंद्रातच असून ही सामुग्री हलविण्याचे काम सुरु आहे.
सध्या दूरदर्शनचे प्रसारण आकाशवाणी केंद्रातून होत आहे. या केंद्रातून २५ ते ३० किलो मिटर अंतरापर्यंत दूरदर्शनच्या प्रसारणाची व्याप्ती आहे. सकाळी ६ ते रात्री १ वाजतापर्यंत न्युज चॅनल व चोवीस तास सह्याद्री व राष्ट्रीय चॅनल सुरु आहे. दूरदर्शन केंद्रात प्रसारणासाठी सात अधिकारी-कर्मचारी तीन पाळीत कार्यरत आहेत. हे तांत्रिक कर्मचारी आहेत.

Web Title: Moving from Mahaltekadi to Doordarshan Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.