काँग्रेसचे महावितरण कार्यालयावर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:59 IST2019-06-27T22:58:55+5:302019-06-27T22:59:41+5:30
शहरात भारनियमन वाढले. आयपीडीएस योजनेची अपूर्ण कामे आहेत. डीबी उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयावर आंदोलन छेडले. मुख्य अभियंत्यासमोर तासभर शहरातील तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला व अधिकाºयांनासुद्धा धारेवर धरले.

काँग्रेसचे महावितरण कार्यालयावर आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात भारनियमन वाढले. आयपीडीएस योजनेची अपूर्ण कामे आहेत. डीबी उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयावर आंदोलन छेडले. मुख्य अभियंत्यासमोर तासभर शहरातील तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला व अधिकाºयांनासुद्धा धारेवर धरले.
प्रेरणानगरातील आदित्य तळकित मृत्यूप्रकरणी कुटुंबाला तातडीने चार लाखांची मदत आणि भावाला त्वरित शासकीय नोकरीत समावून घ्यावे, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. आठ दिवसांत रक्कम देण्यात येईल. नोकरीसंदर्भाचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांना पाठवू, असे आश्वासन मुख्य अभियंत्यांनी दिले.
याप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर, माजी महापौर वंदना कंगाले, माजी उपमहापौर विलास महल्ले, नगरसेविका शोभा शिंदे, प्रदीप हिवसे, माजी कुलगुरु गणेश पाटील, वसंतराव साऊरकर, बी.आर. देशमुख, भैयासाहेब निचत, किशोर शिरभाते, दीपक गुल्हाने, सुरेश रतावा, संतोष देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य दगावला त्या डीबीजवळ महावितरणने तातडीने चेनलिंक फेन्सिंग केले आहे.
शुक्रवारी चौकशी अहवाल
आदित्यच्या मृत्यूनंतर महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी जनमित्र सुरेश किटुकले यांना तडकाफडकी निलंबित केले होते. सहायक अभियंता दीपक बोंडे व प्रभारी सहायक अभियंता प्रफुल्ल देशमुख यांना शो-कॉज बजावली होती. त्यासंदर्भाचा चौकशी अहवाल शुक्रवारी गाडगेनगर विभागाच्या विद्युत निरीक्षक राखी नागपुरे सादर करणार आहेत.