बॅटरी चोरीप्रकरणी दोन महिलांसह ऑटोचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST2021-02-11T04:15:07+5:302021-02-11T04:15:07+5:30

अमरावती : राजापेठ पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणात दोन महिलांसह एका ऑटोचालकाला बुधवारी अटक केली. प्रमोद गोपाळ डाखोरे (४९ रा. ...

Motorist arrested along with two women in battery theft case | बॅटरी चोरीप्रकरणी दोन महिलांसह ऑटोचालकाला अटक

बॅटरी चोरीप्रकरणी दोन महिलांसह ऑटोचालकाला अटक

अमरावती : राजापेठ पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणात दोन महिलांसह एका ऑटोचालकाला बुधवारी अटक केली.

प्रमोद गोपाळ डाखोरे (४९ रा. संतोषी माता कॉलनी), ५० वर्षीय महिला रा. महेंद्र कॉलनी) आणि ४५ वर्षीय महिला रा. जुनीवस्ती, बडनेरा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ४१ हजार ८०० रुपये किमतीच्या पाच बॅटऱ्या आणि एक लाख २० हजारांचा ऑटो असा एक लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी चौकाशी केली असता ऑटोच्या माध्यमातून ट्रकमधील बॅटऱ्यांची चोरी आरोपी करायचे. ऑटो चालक प्रमोद डाखोरेच्या माध्यमातून दोन्ही महिला रात्रीच्या वेळेत उभ्या चारचाकी वाहनांतील बॅटरी चोरी करीत होत्या. त्यांनी या वर्षातील दोन गुन्हे, तर जानेवारी महिन्यातील दोन बॅटरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. गुप्त माहितीवरून पोलिसांनी प्रथम मालती व गंगा या महिलांना ताब्यात घेतले. त्यावेळी ऑटोचालक प्रमोद डाखोरेचेही नाव पुढे आले. राजापेठ हद्दीतील बॅटरी चोरीच्या गुन्ह्यात पोलीस आरोपींचा शोध घेत होते. पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी धुमाळ, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पीआय किशोर शेळके यांच्या यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजेश पाटील, किशोर महाजन, अतुल संभे, विजय राऊत, दानिश शेख, राहुल ढेंगेकार, अमोल खंडेझोड, पवन घोम, चालक निलेश पोकळे, मौसिन शेख यांच्या पथकाने आरोपींना शिताफीने अटक केले.

Web Title: Motorist arrested along with two women in battery theft case