मोर्शीचे उपजिल्हा रुग्णालय भोगतेय मरणयातना

By Admin | Updated: August 6, 2014 23:36 IST2014-08-06T23:36:00+5:302014-08-06T23:36:00+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांसोबतच हे रुग्णालयच मरणयातना भोगत असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून दाखल रुग्णांवर

Morshi's sub-district hospital suffers | मोर्शीचे उपजिल्हा रुग्णालय भोगतेय मरणयातना

मोर्शीचे उपजिल्हा रुग्णालय भोगतेय मरणयातना

मोर्शी : येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांसोबतच हे रुग्णालयच मरणयातना भोगत असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून दाखल रुग्णांवर उपचार करण्याऐवजी अमरावती हलविण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मोर्शीचे रुग्णालय केवळ नावापुरतेच उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे.
५० आंतर रुग्न क्षमतेच्या मोर्शीच्या उपजिल्हा रुग्नालयाकरिता वैद्यकीय अधीक्षकासह एकूण आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजुर आहेत. यात सामान्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे २ पद, फिजीशियन, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, शिशूरोगतज्ज्ञ आणि बधिरीकरण तज्ज्ञ, असे प्रत्येकी एक पद मंजुर असताना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वच पदे रिक्त आहेत.
सध्या वेतनश्रेणीवरील दोन आणि ११ महिन्याच्या कंत्राटावरील २ मिळून एकूण चार सामान्य वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.वैद्यकीय अधीक्षक प्रभारी आहेत. सहायक अधिपरीसेविका आणि सिस्टर-इन-चार्जचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मान्य नाहीत. त्यामुळे शवविच्छेदनाकरिता बाहेरील व्यक्तींची मदत घ्यावी लागते. त्यात वेळप्रसंगी वाद निर्माण होतात.
सोईसुविधांअभावी संतापाचा सामना
रुग्नालयात सोईसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाचा सामना उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागतो. अनेक प्रसंगी अपघातातील अत्यवस्थ रुग्नांचे नातेवाईक आणि मित्र गोंधळ घालतात. त्यामुळे रुग्नावर उपचार करणे अशक्य ठरते. तोडफोडीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अश्या स्थितीत जीव मुठीत घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावणे भाग पडते. पुरेश्या वैद्यकीय सोयीचा अभाव, शासकीय अनास्था, संरक्षणाचा अभाव या कारणांमुळे वैद्यकीय अधिकारी नोकरी सोडून जातात, असेही एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Morshi's sub-district hospital suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.