मोर्शीचे आमदार झाले दर्यापूरचे जावई...; साखरपुडा आटोपून देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 22:43 IST2022-06-29T22:42:06+5:302022-06-29T22:43:26+5:30
Amravati News मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार हे आता दर्यापूरचे जावई झाले आहेत. त्यांचा बुधवारी दर्यापूर येथील डॉ. मोनाली दिलीप राणे यांच्याशी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ लॉन या ठिकाणी साखरपुडा झाला.

मोर्शीचे आमदार झाले दर्यापूरचे जावई...; साखरपुडा आटोपून देवेंद्र भुयार मुंबईकडे रवाना
अमरावती : मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार हे आता दर्यापूरचे जावई झाले आहेत. त्यांचा बुधवारी दर्यापूर येथील डॉ. मोनाली दिलीप राणे यांच्याशी दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ लॉन या ठिकाणी साखरपुडा झाला. एकीकडे साखरपुड्याची लगबग तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर साखरपुडा आटोपून आ. भुयार मुंबईसाठी रवाना झाले.
मोनाली राणे या बीएएमएस आहेत. त्यांचे वडील दिलीपराव राणे हे जिल्हा परिषद निवृत्त शिक्षक आहेत. यावेळी भुयार परिवार व राणे परिवारातील नातेवाईक मित्रमंडळी व आमदार देवेंद्र भुयार यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. साखरपुडा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार देवेंद्र भुयार यांना फोन आला, ‘तुम्हाला उद्या मुंबईला अधिवेशनाला यायचं आहे.’ आमदारांनी आता माझा साखरपुडा सुरू आहे, असे सांगताच या वार्तेचा सूर बदलला आणि अजित पवार यांनी आ. भुयार यांची फिरकीही घेतली. अखेरीस मी आजच रात्रीच्या विमानाने मुंबईला निघतो, असे त्यांनी सांगितले. आमदार देवेंद्र भुयार नागपूरहून मुंबईकरिता बुधवारी रात्रीच मुंबईकडे रवाना झाले.