पोलीस उपायुक्तपदी मोरेश्वर आत्राम रुजू
By Admin | Updated: December 27, 2015 00:33 IST2015-12-27T00:33:59+5:302015-12-27T00:33:59+5:30
दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलीस उपायुक्तपदी शनिवारी मोरेश्वर आत्राम रूजू झालेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुचारू करण्याचा मानस त्यांचा आहे.

पोलीस उपायुक्तपदी मोरेश्वर आत्राम रुजू
अमरावती : दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलीस उपायुक्तपदी शनिवारी मोरेश्वर आत्राम रूजू झालेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुचारू करण्याचा मानस त्यांचा आहे.
पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आहे. ते १९८३ साली पोलीस विभागात रुजू झाले. प्रथम त्यांनी नागपूर शहरात २००४ ते २००७ पर्यंत पोलीस उपनिरीक्षकपद सांभाळले. त्यांनी सोलापूर येथे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्तपद सांभाळले. तेथून बदली होऊन ते नागपूर ग्रामीण येथील सावनेर येथे उपविभागीय अधिकारी पदी रुजू झाले. तेथून त्यांची बदली अमरावतीमध्ये झाली आहे. मोरेश्वर आत्राम यांनी अमरावतीत असताना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न केले. (प्रतिनिधी)