अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूंसाठी शंभरापेक्षा जास्त अर्ज

By गणेश वासनिक | Updated: November 19, 2023 18:50 IST2023-11-19T18:50:32+5:302023-11-19T18:50:41+5:30

निवड समितीकडे अर्ज प्राप्त, आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया

More than hundred applications for ninth Vice Chancellor of Amravati University | अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूंसाठी शंभरापेक्षा जास्त अर्ज

अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूंसाठी शंभरापेक्षा जास्त अर्ज

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरू पदासाठी १०० पेक्षा जास्त अर्ज नाेडल अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. यात दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कुुलगुरू पदासाठी पात्र उमेदवारांनी १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन पाठविले आहेत. आता निवड समिती प्राप्त अर्जातून पात्र उमेदवारांची शॉर्ट लिस्ट तयार करणार असून, त्यानंतर मुलाखत प्रक्रिया राबविली जाणार आहे.

कुलगुरू पदासाठी अमरावतीकर देखील उत्सुक आहे. यात विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, डॉ. विजयकुमार चौबे, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. स्वाती शेरेकर, प्राचार्य डॉ. दीपक धोटे, डॉ. स्मीता देशमुख यांनी अर्ज सादर केले आहे. दिल्ली येथील उच्च शिक्षण संस्थेतून डॉ. काकडे यांनी देखील कुलगुरू पदासाठी अर्ज सादर केल्याची माहिती आहे. येत्या डिसेंबरमध्ये पात्र उमेदवारातून अंतिम पाच जणांची यादी राज्यपालांकडे पाठविली गेली तरच नव्या वर्षात अमरावती विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील, अशी शक्यता आहे.

Web Title: More than hundred applications for ninth Vice Chancellor of Amravati University