मान्सूनची जिल्ह्यात एंट्री, सार्वत्रिक नोंद, २१ जूननंतर कमीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:26+5:30

जिल्हाच्या उत्तर भागात या चक्राकार वाऱ्यामुळे काही प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु जिल्ह्याच्या मध्यभागी २४ तासांपासून पाऊस गायब झालेला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र जर पश्चिम दिशेला सरकले तर जिल्ह्याला याचा फायदा होऊ शकतो. सद्यस्थितीत रविवारी दुपारी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ तासांत विदर्भात बरेच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Monsoon entry in the district, universal record, less likely after June 21 | मान्सूनची जिल्ह्यात एंट्री, सार्वत्रिक नोंद, २१ जूननंतर कमीची शक्यता

मान्सूनची जिल्ह्यात एंट्री, सार्वत्रिक नोंद, २१ जूननंतर कमीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ओरिसा अन् लगतच्या छत्तीसगड ७.६ किमी उंचीवर असलेले चक्राकार वारे व संबंधित कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे अमरावती जिल्ह्यावर १.५ किमी उंचीवर उत्तरेकडून वारे वाहत असल्याने नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्याला अटकाव होत आहे. त्यामुळे दक्षिण विदर्भात पोहचलेल्या मान्सूनला जिल्ह्यात प्रवेश करण्यात काहीअंशी अडचण येत असली तरी बहुतेक ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली आहे.
जिल्हाच्या उत्तर भागात या चक्राकार वाऱ्यामुळे काही प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु जिल्ह्याच्या मध्यभागी २४ तासांपासून पाऊस गायब झालेला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र जर पश्चिम दिशेला सरकले तर जिल्ह्याला याचा फायदा होऊ शकतो. सद्यस्थितीत रविवारी दुपारी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ तासांत विदर्भात बरेच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोमवारी विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारपासून पासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. २१ तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जूनच्या चौथ्या आठवड्यात पावसात कमी येण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

Web Title: Monsoon entry in the district, universal record, less likely after June 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस