विषय समिती निवड प्रक्रियेचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:18+5:30

जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर विषय समितीतील रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी सभा बोलवण्यात आली. मात्र, जिल्हाभरात ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने ही सभा ऐनवेळी स्थगीत करण्यात आली होती. अशातच कोरोनाचे संकट आल्याने जिल्हा परिषदेच्या विषय समितीतील सदस्यांची निवड प्रक्रियाही लांबणीवर पडली होती.

The moment of the subject committee selection process came | विषय समिती निवड प्रक्रियेचा मुहूर्त निघाला

विषय समिती निवड प्रक्रियेचा मुहूर्त निघाला

ठळक मुद्देनियोजन भवनात सभा : तीन महिन्यांनंतर प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषदेतील विषय समितीतील रिक्त जागांच्या निवड प्रक्रियेला अखेर मुहूर्त गवसला. येत्या ३० जून रोजी याकरिता जिल्हा नियोजन भवनात विशेष सभा पार होणार आहे. नियोजन भवनाचे सभागृह विशेष सभेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाने लेखी पत्राव्दारे केली होती. सदर प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असल्याने आता विषय समितीतील रिक्त जागांवर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर विषय समितीतील रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी सभा बोलवण्यात आली. मात्र, जिल्हाभरात ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने ही सभा ऐनवेळी स्थगीत करण्यात आली होती. अशातच कोरोनाचे संकट आल्याने जिल्हा परिषदेच्या विषय समितीतील सदस्यांची निवड प्रक्रियाही लांबणीवर पडली होती.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समितीचे सभापती आणि पंचायत समितीचे सभापती नव्याने निवडण्यात आले. यामुळे विषय समितीत सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडी प्रक्रियेनंतर विषय समितीच्या रिक्त जागांवर निवड केली जाते. परंतु, यावेळी विविध कारणांनी समिती सदस्यांच्या निवडीसाठी तब्बल तीन महिन्यांपर्यत लांबणीवर पडली होती. याला मंजुरी मिळल्याने आता येत्या ३० जून रोजी दूपारी १ वाजता जिल्हा परिषदेची विषय समिती सदस्य निवडीची प्रक्रिया पार पडण्यासाठी जिल्हा नियोजन भवनात आमसभा होणार आहे.यामध्ये विषय समिती मध्ये रिक्त असलेल्या जागावर जिल्हा
परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांच्या निवड करून समिती सदस्यांची पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांपासून समितीविना असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पं.स. सभापती यांची प्रतीक्षा संपणार आहे.

Web Title: The moment of the subject committee selection process came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.