मोकाट श्वानांचा धावत्या वाहनांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST2021-02-08T04:12:57+5:302021-02-08T04:12:57+5:30

रेल्वे स्टेशन मार्गावर वाहन दुरुस्तीची कामे अमरावती : येथील इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर वाहन दुरुस्तीचे गॅरेज वाढल्याने सिमेंटच्या ...

Mokat dogs attack speeding vehicles | मोकाट श्वानांचा धावत्या वाहनांवर हल्ला

मोकाट श्वानांचा धावत्या वाहनांवर हल्ला

रेल्वे स्टेशन मार्गावर वाहन दुरुस्तीची कामे

अमरावती : येथील इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर वाहन दुरुस्तीचे गॅरेज वाढल्याने सिमेंटच्या अर्ध्या रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

------------------------

इर्विन रुग्णालयासमोर रुग्णवाहिकांची गर्दी

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर रुग्णवाहिका सातत्याने उभ्या राहत असल्यामुळे रुग्णांसह ये-जा करणाऱ्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात आवक-जावक राहत असताना तेथील रुग्णवाहिका हटविण्याची मागणी होत आहे.

---------------------

शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

अमरावती : महापालिका क्षेत्रात म्हशीचे तबेले था गाईचे गोठे ठिकठिकाणी असल्याने वाहतुकीच्या मार्गावर गुरे रवंत करताना दिसतात. त्यामुळे वाहनधारकांना मार्ग काढताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Mokat dogs attack speeding vehicles