मोदी लाटेचा करिश्मा औटघटकेचा
By Admin | Updated: August 4, 2014 23:29 IST2014-08-04T23:29:56+5:302014-08-04T23:29:56+5:30
लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा दिसला खरा; तथापि, तो औतघटकेचाच असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरुन आगामी विधानसभा

मोदी लाटेचा करिश्मा औटघटकेचा
निर्धार मेळावा : अजित पवारांनी फुंकला कार्यकर्त्यांमध्ये विश्वास
अमरावती : लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा दिसला खरा; तथापि, तो औतघटकेचाच असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरुन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या जोमाने आणि यशाच्या खात्रीने कामाला लागा. येणारा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी कार्यकर्त्यांनामध्ये फुंकला.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. रवी राणा, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, सुरेखा ठाकरे, नंदकिशोर वऱ्हाडे, नवनीत राणा, सुनील वऱ्हाडे, प्रताप भुयार, मेघा हरणे, गणेश राय, प्रल्हाद सुंदरकर, अनिल ठाकरे, अजिज पटेल, संतोष महात्मे, प्रदीप राऊत, विजय भैसे, नितीन हिवसे, नीलिमा महल्ले, चंद्रशेखर देशमुख, सुनील काळे, सपना ठाकूर, नानक आहुजा, लक्ष्मीकांत खाबीया, संदीप मेघे, रवींद्र गायगोले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील वऱ्हाडे यांनी केले.
महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर प्रगतशिल वाटचाल करीत आहे.
येत्या ७० ते ७५ दिवसांनंतर विधानसभा निवडणुका लागण्याचे संकेत असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास कामाच्या भरवशावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. (प्रतिनिधी)