छत्री तलावात अग्निशमन दलाचे ‘मॉकड्रिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:32+5:302021-09-17T04:16:32+5:30

फोटो पी १५ छत्री तलाव अमरावती : दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सखल भाग जलमय होत असतात. अशा परिस्थितीत मदत ...

Mock drill by fire brigade at Chhatri Lake | छत्री तलावात अग्निशमन दलाचे ‘मॉकड्रिल’

छत्री तलावात अग्निशमन दलाचे ‘मॉकड्रिल’

Next

फोटो पी १५ छत्री तलाव

अमरावती : दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सखल भाग जलमय होत असतात. अशा परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी १५ सप्टेंबर रोजी अग्निशमन विभागाने छत्री तलाव येथे मॉकड्रिल केले.

आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, साधन सामग्रीचा कशाप्रकारे वापर करावा, याबाबतचा मान्सूनपूर्व सराव करण्यात आला. त्यामुळे आता आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचाव कार्यात अग्निशमन दल सज्ज असल्याचे अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांनी स्पष्ट केले. यावेळी अग्निशमन उपकेंद्रप्रमुख सैयद अनवर, फायरमन संतोष केंद्रे व अग्निशमन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी पूर परिस्थितीत बचाव व मदत कार्याची प्रात्यक्षिके सादर केली.

/////////

बॉक्स

असा आहे ताफा

अग्निशमन दलाकडे सध्या २ फायबर बोटी व २ ओबीएम मशीन अग्निशमन दलाकडे आहेत. त्याचबरोबर लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप शिडी, पोर्टेबल पम्प, कॉंक्रिट कटर, गेअर ब्रेकर, वेगवेगळ्या प्रकारची दोरे, गॅस डिटेक्टर, हेवी टॉर्च, ग्राउंड मॉनिटर, एक्स्टेंशन लॅडर, झाड तोडण्याचे पेट्रोल कटर, विद्युत कटर, कोयते, कुऱ्हाडी, रेस्क्यू हार्नेस, फायर हुक आदींसह अत्याधुनिक फायर फायटर वाहनेही अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहेत.

Web Title: Mock drill by fire brigade at Chhatri Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.