शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रवी राणांची हिवाळी अधिवेशनाकडे पाठ, मंत्रिपद न मिळाल्याने कमालीचे नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:52 IST

Amravati : मंत्रिपद न मिळाल्याने कमालीचे नाराज, रविवारी रात्रीपासून मुक्कामी, मंगळवारी शेतात गायींसोबत विरंगुळा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने बडनेराचे आमदार रवी राणा हे कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राणा गत दोन दिवसांपासून अमरावतीत मुक्कामी आहेत. रवी राणा हे मंगळवारी चक्क शेतात गेले आणि गो सेवेत रमले. एवढेच नव्हे तर शेतात गायींसोबत विरंगुळा करीत असल्याचा व्हिडीओदेखील त्यांनी माध्यमांना पाठविला. 

मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु असतानाच आमदार राणा यांनी नागपूर सोडले होते. ते रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अमरावतीत निवासस्थानी पोहोचले होते. गत दोन दिवसांपासून राणांनी अधिवेशनाकडे पाठ फिरविली आहे. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीसाठी बडनेराची जागा सोडण्यात आली होती. बडनेरातून रवी राणा हे ६७ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यासोबतच पहिल्यांदाच अमरावती जिल्ह्यातून भाजपला पाच जागांवर विजय मिळवून देण्यात राणा दाम्पत्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राणा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, याबाबत रवि राणांना शाश्वती होती. त्यानुसार मोर्चेबांधणीदेखील त्यांनी केली होती, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. मात्र, रविवारी विस्तारापूर्वीच रवी राणांचे मंत्रिपदाच्या यादीतून नाव गायब झाल्याचे कळताच ते कमालीचे नाराज झाले. शपथविधी समारंभाला हजर न राहता राणांनी नागपूर सोडले नि अमरावती गाठले. मंगळवारी शेतात दिवस घालविला. गो सेवेला प्राधान्य देत जणू 'विस्तारा'वर कानाडोळा करण्याचा या माध्यमातून आमदार राणांनी प्रयत्न केला, असाच त्यांच्या चेहऱ्यावरील भाव दिसून आला, हे विशेष.

होर्डिंग ठरले घातक? गत आठवड्यात आ. रवी राणा यांचे भावी कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री असे लागलेले बॅनर्स जिल्ह्यातील अनेक धुरिणांना सल म्हणून बोचले. राणा मंत्री झाले तर आपले राजकीय अस्तित्व संपेल, असाच अनेकांचा समज झाला होता. मुख्यमंत्र्यांशी राणांची मैत्री असल्याने त्यांना मंत्रिपद मिळू शकते. हे हेरून राणाविरोधकांनी नागपूर येथे परिवारातून 'फिल्डिंग लावली अन् मंत्रिपदापासून रोखण्यात ते यशस्वी झाले, अशी माहिती आहे.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर