आमदार यशोमती ठाकूर यांच्या मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग
By Admin | Updated: November 3, 2014 23:18 IST2014-11-03T23:18:10+5:302014-11-03T23:18:10+5:30
१० वर्षांपूर्वी नातेवाईकांकडून घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचा अज्ञाताकडून गैरवापर होत असल्याची तक्रार आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे केली आहे.

आमदार यशोमती ठाकूर यांच्या मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग
अमरावती : १० वर्षांपूर्वी नातेवाईकांकडून घेतलेल्या मोबाईल क्रमांकाचा अज्ञाताकडून गैरवापर होत असल्याची तक्रार आमदार यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्याकडे केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी 9422400191 हा मोबाईल क्रमांक त्यांचे नातेवाईक चारुशिला घोरपडे यांच्याकडून घेतला होता. तेव्हापासून यशोमती ठाकूर याच क्रमांकाचा वापर करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून त्याच क्रमांकाचा अज्ञाताकडून दुरुपयोग होत असल्याचे ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. अज्ञाताने एकाच मोबाईल क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड तयार करुन मोबाईल क्रमांकावरुन संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे ठाकूर यांच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भांत त्यांनी सोमवारी दुपारी १ वाजता विद्यापीठ परिसरात पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांची भेट घेतली. पोलीस आयुक्त विद्यापीठ परिसरात राज्यपालांच्या आगमनाच्या सुरक्षेसंबंधी पाहणी करीत होते. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी त्यांच्याशी चर्चा करुन तोंडी तक्रार केली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी लेखी तक्रार करण्याचे यशोमती ठाकूर यांना सुचविले. तक्रार दाखल केल्यावर चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी यशोमती ठाकूर यांना दिले. (प्रतिनिधी)