अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST2021-07-21T04:10:28+5:302021-07-21T04:10:28+5:30
संत्रा मंडईतीली इन्र्हर्टर लंपास पथ्रोट : संत्रा मंडईतील खोलीतून इन्व्हर्टर लंपास केल्याची घटना वाल्मिकपूर शिवारात १८ जुलै रोजी घडली. ...

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले
संत्रा मंडईतीली इन्र्हर्टर लंपास
पथ्रोट : संत्रा मंडईतील खोलीतून इन्व्हर्टर लंपास केल्याची घटना वाल्मिकपूर शिवारात १८ जुलै रोजी घडली. अ. हपीज शे. हबीब (४१, रा. पथ्रोट) यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध १९ जुलै रोजी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
-----------------
हिस्सेवाटणीवरून दोन भावात वाद
दर्यापूर : घराच्या हिस्सेवाटणीतून दोघा भावात वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच काठीने मारून जखमी केल्याची घटना आमला येथे १८ जुलै रोजी सायंकाळी घडली. मनोज भानुदास कुरवाडे (२६) याच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी रोशन भानुदास कुरवाडे (२६) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------
शेतातून १५०० रुपयांचे केबल लंपास
वरूड : शेतातील विहिरीवरून मोटारपंपाला लागलेला केबल अज्ञाताने लंपास केल्याची घटना १६ जुलै दरम्यान उघड झाली. जुशन खाॅ वल्द रफीक खाॅ (रा. जवाहर शाळेजवळ वरूड) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध १९ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.
--------------------
चौघांकडून इसमाला पाईपने मारहाण
नांदगाव खंडेश्वर : शेताचा वाद तहसील कार्यालयस्तराव सुरू असताना अपीलचा दावा का टाकला, असे म्हणून इसमाला चौघांनी लोखंडी पाईपने मारून जखमी केले. ही घटना चांदूर तालुक्यातील बोरी येथे २० दिवसापूर्वी घडली. सुरेश चेटुले (७०, रा. बोरी) यांच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी बाळकृष्ण जयराम वाघाडे, अमित वाघाडे, आकाश वाघाडे, रामा वाघाडे (सर्व रा. बोरी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------
वॉटर सप्लायरसमोरू दुचाकी लंपास
चांदूर बाजार : येथील वॉटर सप्लायरसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना १४ जुलै दरम्यान घडली. मो. सलीम मो. इशाक (३६, रा. कसबेगव्हाण) यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------------
दुचाकीस्वाराची पादचाऱ्याला धडक
चांदूर बाजार : भरधाव दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला धडक देऊन जखमी केल्याची घटना १९ जुलै रोजी रात्री १० वाजता दरम्यान घडली. विलास भीमराव खवले (५५, रा. सोनोरी) यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी दुचाकीस्वार वैभव प्रकाश गणोरकर (३२, रा. सोनोरी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.