शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

अल्पवयीन मुलीवर वडील, थोरल्या भावाकडून वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:15 IST

१७ वर्षीय पीडिताच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले.

अमरावती : जन्मदाते वडील, रक्षणाची जबाबदारी असलेला थोरला भाऊ व काका (मावशीचा नवरा) यांनी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील एका शहरात सोमवारी उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी पीडिताचे वडील, भाऊ, काका व मावशीविरुद्ध गुन्हा नोंदविला. वडील आणि भावाला अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.पोलीस सूत्रानुसार, १७ वर्षीय पीडिताच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. दरम्यान, ८ एप्रिल २०१८ रोजी पीडितेवर वडिलाने पाशवी बलात्कार केला. ती रडली. वडील असून असे कसे करू शकता, असा सवाल केला. परंतु, पाषाणहृदयी बापाला पाझर फुटला नाही. त्याने पुन्हा अत्याचार केला. पीडिताने लगतच्या तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मावशी आणि तिच्या पतीला आपबीती सांगितली. त्यांनी तिला बोलावून घेतले. मावशीकडे राहत असतानाच मावशीच्या पतीने (काका) तिच्यावर बलात्कार केला. ही बाब पीडिताने मावशीला सांगितली. हा प्रकार वारंवार सुरू होता. मुलीचे मानसिक संतुलन ठीक नाही. तिला औषधी सुरू आहेत, असा अपप्रचार मावशीने आजूबाजूला केला. त्यामुळे शेजारी-पाजारी सांगण्याचा प्रयत्न पीडिताने केला, पण व्यर्थ! पीडिता नाइलाजाने पुन्हा वडिलांकडे परतली. पण, भावानेही लहान बहिणीवर बलात्कार केला.तिने २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील एका तालुका मुख्यालयातील पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला सहायक पोलीस निरीक्षकाने तिची आपबीती ऐकून घेतली. तिला धीर दिला. विश्वासात घेऊन संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. प्राथमिक चौकशी व खातरजमा केल्यानंतर, सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.पीडिताच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वडील व भावाला सोमवारी अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.- हरी बालाजी एन., जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी