शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तर  मंत्रालयात, कृषी सचिवांच्या कार्यालयात 'फवारणी'करू - आ. बच्चू कडू यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 16:52 IST

शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.

यवतमाळ  -  शेतीतील पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या २० शेतकरी,शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला,७०० ते ८०० शेतकरी,शेतमजुरांना विषबाधा झाली,अनेक अजूनही गंभीर अवस्थेत आहेत.या अवस्थेत मृतकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची सरकारने तातडीने मदत करावी, विषबाधा झालेल्याना प्रत्येकी १ लाख रुपये सानुग्रह मदत करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केली. जर शासन मदत करत नसेल तर मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात आपण त्यात कीटकनाशकांची फवारणी करू असा इशारा त्यांनी दिला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दि.२ ऑक्टोबर रोजी आ. बच्चूभाऊ कडू यांनी यवतमाळ येथे येऊन विषबाधा झालेल्या शेतकरी,शेतमजुरांच्या प्रकृतीची यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयात विचारपूस केली केली. रात्री ८ वाजता च्या सुमारास आमदार कडू जिल्हा रुग्णालयात पोहचले त्यानी उपचार घेत असलेल्या शेतकरी,शेतमजुरांच्या प्रकृतीची विचारपूस करून उपस्थित डॉक्टर कडून या संदर्भात माहिती घेतली.शेकडो रुग्ण विषबाधित झाल्या नंतर सुद्धा गरीब रुग्णांना 'बाहेरन औषध'आणावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या सोबत प्रहार चे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे यवतमाळ जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे,विलास पवार,जिल्हासंपर्क प्रमुख आशिष तुपटकर,उपजिल्हाप्रमुख नितीन महल्ले,चंद्रकांत बोरले,आकाश चिंचोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार बच्चूभाऊ कडू यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देण्यापूर्वी घाटंजी तालुक्यातील आकपुरी येथील आत्महत्याग्रस्त दोन शेतकरी कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले. त्या नंतर टिटवी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास भेट दिली. 

सरकार 'मरणात'सुद्धा भेदभाव करत आहे 

मुंबईत रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते सर्व कस्टकरी होते. त्यांना राज्य सरकारने तातडीने ५ लाख रुपयांची व रेल्वे प्रशासनाने ५ लाख रुपये मदतीची घोषणा केली.  तर दुसरी कडे यवतमाळ जिल्ह्यात कस्टकरी शेतकरी व शेतमजुरांच्या जीवाचे मोल सरकारला का कळत नाही..?शेतातील पिकं वाचविण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणारे २० अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर आपला जीव गमावतात शेकडो शेतकरी, मजूर मृत्यूशी झुंज देत आहेत मात्र सरकार व जिल्हाप्रशासन पाहू,चौकशी करू अशा थापा मारण्यात वेळ घालवत आहे. शहरी व ग्रामीण असा भेद करणाऱ्या सरकारने कस्टकरी माणसांच्या मरणात सुद्धा भेद करत असल्याचा आरोप बच्चूभाऊ कडू यांनी केला. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार