राज्यमंत्री बच्चू कडू यांचा जन्मदिन सेवा दिन म्हणून साजरा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:12+5:302021-07-07T04:15:12+5:30
वणी बेलखेडा येथे गरजुना मदतीचा हात; साहित्य वाटप व वृक्षारोपणाने दिवस साजरा चांदुर बाजार : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू ...

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा जन्मदिन सेवा दिन म्हणून साजरा;
वणी बेलखेडा येथे गरजुना मदतीचा हात;
साहित्य वाटप व वृक्षारोपणाने दिवस साजरा
चांदुर बाजार : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस प्रहार कार्यकर्त्यांनी सेवा दिवस म्हणून साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, वणी बेलखेडा येथे प्रहारचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विधवा, गरजू महिलांना साडी व पातळ वाटप कार्यक्रम, गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व वृक्षारोपण इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील भाजी विक्रेत्यांना पावसाळ्यात पाण्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू लोकांचा विमा काढून देणे, गरीब, गरजूंना घरावर टाकण्यासाठी टिनपत्रे वाटप करणे तसेच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेल्या कामगारांना अवजार पेटी वाटप इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला ब्राह्मणवाडा, थडीचे ठाणेदार दीपक वळवी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आरती राऊत, उपसरपंच अशोक अलोने, सदस्य अवधूत नव्हाळे, अनुपमा ठाकरे, नीता मेश्राम होते. यावेळी प्रहार कार्यकर्ते प्रफुल नवघरे, सुरेश अलोने, माजी उपसरपंच जैनुल सौदागर, अविनाश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी सुनील मोहोड, अमोल शेळके, अमोल ठाकरे, अतुल राऊत, भैया राऊत, सुमित शेळके, अंकुश नागझीरकर, मुकेश अलोने, विशाल पाटील, आदित्य ठोकळ, अजय गावंडे, ऋषिकेश चव्हाण, अतुल ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला गजानन ठाकरे, राजू पाटील, विनायक नाईक, अजिम सौदागर, रवींद्र दाते, श्रीकांत कोठाळे, राम घोम, वसंत नवघरे, योगेशभाऊ पाथरे, प्रफुल फुले यांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.