सदस्य निवड प्रक्रिया पुन्हा आयुक्तांच्या कोर्टात

By Admin | Updated: May 30, 2015 00:40 IST2015-05-30T00:40:41+5:302015-05-30T00:40:41+5:30

मागील कित्येक दिवसांपासून जिल्हा परिषद विषय समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया विविध कारणामुळे रखडून ...

The member selection process again in the Commissioner's Court | सदस्य निवड प्रक्रिया पुन्हा आयुक्तांच्या कोर्टात

सदस्य निवड प्रक्रिया पुन्हा आयुक्तांच्या कोर्टात

जिल्हा परिषद : राजकीय कुरघोडीत अडकला तिढा
अमरावती : मागील कित्येक दिवसांपासून जिल्हा परिषद विषय समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया विविध कारणामुळे रखडून पडली होती. अखेर हा प्रश्न निकाली काढण्यासाठी २९ मे रोजी बोलविण्यात आली. या सभेत अध्यक्ष सतीश उईके यांनी पुन्हा निवड प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्ताचे मार्गदर्शन मागविण्याची सूचना केल्याने हा तीढा कायम आहे.
जिल्हा परिषद विषय समितीच्या रिक्त असलेल्या १७ जागासाठी एकूण १९ सदस्यांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य आणि पंचायत समितीच्या सभापतीचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती या समिती मधील रिक्त असलेल्या समितीत सदस्य निवडावयाचे आहेत. शुक्रवारच्या बैठकीतही तीढा न सुटल्याने यामध्ये राजकारण शिरल्याचा आरोप केल्या जात आहे.

Web Title: The member selection process again in the Commissioner's Court