शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्य बजावण्यात मेळघाट पुढे अन् अमरावती माघारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:34 IST

Amravati : आठ मतदारसंघात १६० उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जिल्ह्यात आठ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात सकाळी ७ पासून तर सायंकाळी ६ दरम्यान झालेल्या मतदान आकडेवारीनुसार कर्तव्य बजावण्यात मेळघाट ७१.७५ टक्केवारीने पुढे राहिला, तर अमरावती मतदारसंघात ५५.९८ टक्केच मतदान झाल्याने माघारला आहे.

जिल्ह्यात २५ लाख ४६ हजार ४५८ मतदारांची नोंदणी झाली होती. गेल्या १५ दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला असताना बुधवारी अमरावती जिल्ह्यातील १६० उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. आता आपला आमदार कोण, हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

बुधवारी कष्टकरी, श्रमजीवी आणि कामगार वस्त्यांमधील मतदान हे सकाळी १० पूर्वीच झाल्याचे दिसून आले. सायंकाळी ५ नंतरचे मतदान हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बाहेरगावाहून परतलेल्या नागरिकांचे होते. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, तिवसा येथे उशिरापर्यंत मतदान झाले. आठ मतदारसंघात एकूण २,७०८ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

मेळघाटातील आदिवासी मतदार झाला सुजान अनुसूचित जमातीसाठी राखीव मेळघाट मतदारसंघात सर्वाधिक ७१.७५ टक्के मतदान झाले. त्यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधव मतदानाबाबत सुजाण झाल्याचे दिसून येते. अचलपूर मतदारसंघात ७१.१४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीत दुसऱ्या क्रमांकावर अचलपूर राहिले.

मतदारसंघ                    टक्केवारी अचलपूर                       ७१.१४ टक्के   धामणगाव                     ६७.२१ टक्के मेळघाट                        ७१.७५ टक्केबडनेरा                         ५७.५७ टक्केदर्यापूर                          ६५.८४ टक्के मोर्शी                             ७१.३० टक्केअमरावती                      ५५.९८ टक्के तिवसा                           ६७.१० टक्के

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MelghatमेळघाटAmravatiअमरावती